उरण पंचायत समितचे नवनिर्वाचित उपसभापती हिराजी घरत यांनी स्विकारला कार्यभार
सिटी बेल • उरण • वैशाली कडू •
उरण पंचायत समितीतील शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य हिराजी घरत हे उपसभापतीपदी निवड झाल्या नंतर आज सोमवार दिनाकं ७ मार्च रोजी त्यांनी जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यभार स्वीकारला.

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी सभापती सौ समिधा म्हात्रे व नवनिर्वाचित उपसभापती हिराजी घरत यांना भगवी शाल व पुष्पगुच्छ देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या व येणाऱ्या प्रत्येक निवडणूकीत महाविकास आघाडीसाठी हिराजी घरत यांची निवड ही विजयाची नांदी आहे असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत, माजी सभापती सागर कडू , शे का पक्षाचे नेते काका पाटील, शिक्षक नेते नरेश मोकाशी, मनोज पाटील, विभागप्रमुख रजनीकांत पाटील, डोगरी शाखाप्रमुख सचिन पाटील, थळी, पंचायत समिती सदस्य, कार्यकर्ते व गट विकास अधिकारी उपस्थित होते.








Be First to Comment