Press "Enter" to skip to content

उरण जेष्ठ नागरिक मंडळाच्या अध्यक्षपदी हसमुख भिंडे

सिटी बेल • उरण • वैशाली कडू •

उरण तालुका जेष्ठ नागरिक मंडळाच्या अध्यक्षपदी उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे खजिनदार हसमुख (पालू) भिंडे यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी हसमुख भिंडे यांची निवड जाहीर होताच त्यांचे उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

उरण तालुका जेष्ठ नागरिक मंडळाची सभा नुकतीच सपन्न झाली. या बैठकीत नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली आहे.

नवनिर्वाचित कार्यकारणी पुढील प्रमाणे अध्यक्षपदी हसमुख (पालू) भिंडे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी अरुणकुमार मोदी, सचिवपदी उमेश नाईक, सहसचिव सौ. केतना चौधरी, खजिनदारपदी रफीक मालीम यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित कार्यकारणी जाहीर होताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.