जागतिक महिला दिनानिमित्त दातार कॅन्सर जेनेटिक्स व कोकिलाबेन हॉस्पिटल कर्करोग विरोधात लढण्यासाठी एकत्र !!
सिटी बेल • आरोग्य प्रतिनिधी •
कर्करोगाचे नाव ऐकल्यावर सर्वांनाच धडकी भरते कर्करोगाबद्दल भरपूर संशोधन झाले असले तरी कर्करोगाची कारणे पुरेशी कळलेली नाहीत. भारतामध्ये अनेकांना कर्करोग झाल्याचे निदान शेवटच्या टप्प्यात होते परंतु कर्करोगाला जर हरवायचे असेल तर शारीरिक वैद्यकीय तपासण्या नियमितरित्या करणे फार गरजेचे आहे. जागतिक महिला दिन व जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने दातार कॅन्सर जेनेटिक्स यांनी कोकिलाबेन हॉस्पिटल यांच्याशी सहकार्य करून कर्करोग तपासण्याची एक तपासणी श्रेणी उपल्बध करून दिली आहे, या तपासणी अंतर्गत एका साध्या रक्ततपासणी मुळे ३० पेक्षा जास्त प्रकारचे कर्करोग शोधण्यास मदत होणार आहे.
याविषयी अधिक माहिती देताना दातार कॅन्सर जेनेटिक्स- न्यू कॅन्सर इनिशिएटिव्हच्या डायरेक्टर समारा महिंद्रा म्हणाल्या “कर्करोग हा एक जीवघेणा आजार झाला आहे परंतु त्याचे लवकर निदान झाल्यास त्यावर यशस्वी उपचार करता येतात. कॅन्सरला हरवण्याची गुरुकिल्ली म्हणजे स्क्रीनिंग आणि लवकरात लवकर निदान होणे गरजेचे आहे व त्यासाठी आम्ही हि विशेष कर्करोग तपासणी श्रेणी कार्यन्वित केले आहे. या तपासणीचे नाव इजी चेक ३६० असे असून या चाचणी अंतर्गत रक्त तपासणीद्वारे ३० प्रकारच्या कर्करोगांचे शरीरातील स्थान दर्शवते आणि कर्करोगाच्या उत्पत्तीचे ऊतक ओळखले जाऊ शकते.
या तपासणीनंतर कर्करोग तज्ज्ञांमार्फत योग्य परिणाम लावून पुढील मार्गदर्शन मिळते व या दरम्यान जर निदान झाले तर कमीत कमी उपचार खर्च व एक चांगले जीवन मिळू शकते. निसर्गत: आपल्या शरीरात नेहमीच थोडया कर्कपेशी सतत तयार होत असतात. त्यातील ब-याच कर्कपेशी आपोआप नष्ट होतात. मात्र काही शिल्लक राहतात व या पेशींना शरीरात सकारात्मक वातावरण भेटले तर कर्करोग आजार बळावू शकतो. “
या बहु-कर्करोग स्क्रिनिंग चाचण्या जागतिक आरोग्य संघटनेच्या अंतर्गत नोंदणीकृत असून एक चांगले मानांकन मिळाले आहे. या कर्करोग चाचण्या एखाद्या व्यक्तीच्या परिधीय रक्तातील सर्क्युलेटिंग ट्युमर सेलचे विश्लेषण करतात, ज्याचा उद्देश विघातक पेशींची उपस्थिती शोधणे आहे आणि कर्करोग लवकर शोधण्यास मदत होते तसेच या चाचण्यांमध्ये ९९ % पेक्षा जास्त अचूकता असल्याचे वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे. हि कर्करोग तपासणी चाचणी ३० वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे.








Be First to Comment