Press "Enter" to skip to content

शंभरहून अधिक रुग्णांनी घेतला लाभ

लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहाच्या मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद

सिटी बेल • गोवे-कोलाड • विश्वास निकम •

रोहा तालुक्यातील मुठवली खुर्द येथे लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहा यांच्या वतीने क्लबचे मार्गदर्शक झोन चेअरपर्सन लायन रविंद्र घरत व रोहा लायन्सक्लब चे लायन पराग फुकणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिफा क्लिनिकचे व्यवस्थापक डॉ फरीद चिमावकर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्थ व युवक मंडळ मुठवली यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते याला रूग्णांच्या उत्स्फुर्त प्रतिसाद देत विभागातील शंभरहून अधिक रुग्णांनी घेतला लाभ .

आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात 120 रुग्णांची तपासणी व 90 रुग्णांना तपासणी अंतर्गत मोफत औषधोपचार करत रुग्णांचा मधुमेह आणि अस्थीरोग,या दोन विशिष्ट आजारांवर रुग्णांची मोफत तपासणी करत त्यांना मोफत औषधोपचार करण्यात आले तसेच रुग्णांचा डायबेटीस शरीरातील साखरेचा प्रमाण त्याचा चढ उतार हाडांची तपासणी यात संधी वात, त्यातील कॅल्शिअम चा प्रमाण, व हाडांची झालेली झीज, शरीरातील पाण्याचा प्रमाण, यावर डॉ फरीद चिमावकर आणि त्यांच्या टीमने उत्तमरीत्या आधुनिक पद्धतीने आलेल्या सर्व रुग्णांची तपासणी केली .

डॉ फरीद चिमावकर ,प्रकाश गुप्ता, मुस्तफा कारभारी, (फ्युजन हेल्थ केअर) विपीन मिश्रा (mankind farma) प्रदीप नाजरेकर (beid helth care) सेविका सोनाली शेडगे,मुस्काम शेख,इत्यादींनी उपस्थित सर्व रुग्णांची मोफत तपासणी करत त्यांना विविध आजारांवर उपचार दिले.
यावेळी लायन्सक्लब चे सेक्रेटरी रविंद्र लोखंडे,खजिनदार डॉ श्यामभाऊ लोखंडे,लायन राजेंदर कोप्पू,सौ पूजा लोखंडे तसेच सरपंच हेमंत मालुसरे, उपसरपंच योगेश शिंदे,सदस्य मारुती तुपकर, पोलीस पाटील राम सावंत, हभप नथुराम तुपकर,चंद्रकांत शिंदे, ऋषिकेश खंडागळे,काशिनाथ ठाकूर, येणाजी शिंदे,दत्तात्रेय तुपकर,पांडुरंग शेळके,गजानन तुपकर,सहदेव शिंदे, शांताराम आयरे,बेंडू बामणे सह प्रमुख मान्यवर व आदी ग्रामस्थ व रुग्ण बहुसंख्येने उपस्थित होते.

आयोजित केलेल्या विविध आजारांवर मोफत आरोग्य शिबिराची सुरवात दीपप्रज्वलन शिवछत्रपती यांच्या प्रतिमेचे पूजन आलेल्या सर्व उपस्थित डॉक्टर व मान्यवरांचे स्वागत लायन महेश तुपकर व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र लोखंडे यांनी केले प्रस्ताविक श्यामभाऊ लोखंडे यांनी केले तर डॉ फरीद यांनी उवस्थित रुग्णांना विविध आजारांवर मोलाचे मार्गदर्शन केले व डॉ फरीद यांचा वाढदिवस म्हणून तर लायन्सक्लब चे सेक्रेटरी रविंद्र लोखंडे यांना राज्यस्तरीय गुणवंत गुरुजन शिक्षकरत्न गौरव पुरस्कार मिळाला असल्याने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आले तर लायन महेश तुपकर यांनी आभार प्रदर्शन करत याची सांगता करणयात आली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.