सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे)
खांब विभागातील विविध गावातील विद्युत समस्या मार्गी लागाव्यात यासाठी महावितरण कोलाड विभागाकडून विविध गावात नवीन विद्युत डिपी बसविण्यात आल्या आहेत.
पावसाळा आणि विद्युत समस्या यांचे परस्पर संबंध तसे कायमचे.पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर विद्युत समस्या निर्माण होत असल्याने ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यातच विजेचे पोल कोसळणे,विद्युत वाहिन्या तुटणे,डिपीमध्ये बिघाड होणे,डिओ उडणे या समस्या तर हमखास निर्माण होतात.तर बहुतांश वेळा विद्युत डिपीमध्ये बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित होणे असे प्रकार वारंवार घडत असतात. तसेच डिपीमध्ये वारंवार बिघाड होण्याचे प्रकारही घडत असतात. यावर उपाय म्हणून कोलाड उप अभियंता नितीन जोशी यांनी विभागातील जिर्णावस्थेेत असणाऱ्या विद्युत डिपी बदलण्याचा निर्णय घेऊन व त्या द्रुष्टीने अमंलबजावणी करून कार्यवाहीला सुरुवात देखील केली आहे. त्याच अनुषंगाने जीर्ण झालेल्या विद्युत डिपी बदलण्याचे कामास प्रारंभ देखील करण्यात आला आहे.
खांब विभागातील खांब,तळवली तर्फे अष्टमी, देवकान्हे आदी ग्रा.पंचायत हद्दीतील गावामध्ये नवीन विद्युत डिपी बसविण्याचे काम वितरण कर्मचारी बबन महाडिक, वामन कदम व अनिकेत मरवडे हे ग्रामस्थांचे सहकार्याने मोठ्या मेहनतीने तळमळीने करीत आहेत.तर कोलाड महावितरण यांच्या वतीने करण्यात येत असलेल्या या कामाबद्दल विभागातील ग्रामस्थांना चांगला दिलासा प्राप्त झाला असून या कामाबद्दल समाधान व्यक्त होताना दिसत आहे.






Be First to Comment