Press "Enter" to skip to content

मॉर्सन केमिकल कंपनीमध्ये भीषण आग

तळोजा एम आय डी सी मधील रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत मोठे नुकसान

सिटी बेल • पनवेल • संजय कदम •

पनवेल जवळील तळोजा औद्योगिक वसाहत मधील रासायनिक कंपनीला मध्य रात्रीच्या सुमारास  लागलेल्या आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले असे तरीही सुदैवाने कोणतीही जीवित हानी जाही नाही आहे. तळोजा औद्योगिक वसाहती मधील प्लॉट नं १७/२२ मॉर्सन केमिकल कंपनीमध्ये मध्य रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली.

आगीची माहिती मिळताच तळोजा पोलीस ठाण्याचे पथक तसेच अग्नीशमन दलाचे पथक घटना स्थळी रवाना झाले व त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून पहाटे चारच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले, आगीमध्ये कुठल्याही प्रकराची जीवित हानी नाही झाली. सादर आग हि शॉर्टसर्किट मुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.