Press "Enter" to skip to content

यशवंतखार येथे महाशिवरात्री निमीत्त  रंगल्या कुस्ती स्पर्धा

सिटी बेल • कोलाड नाका •   

रोहा तालुक्यातील यशवंतखार गावी महाशिवरात्री उस्तव मोठ्या उस्ताहात संपन्न झाला  त्या निमित विविध धार्मिक कार्यक्रमा बरोबर क्रिकेट बरोबर विशेष आकर्षण असलेल्या कुस्त्याच्या स्पर्धा झाल्या मुलांच्या क्रिडा नेपुनाला वाव मिळावा म्हणुंन अनेक स्पर्धा होत असल्या तरी मुलांचे शरीर बलदंड व्हावे याकरिता आयोजित केलेल्या कुस्त्याच्या आखाड्या च्या स्पर्धा यशवंत खार गावी चांगल्याच रंगल्या.                   

सदर स्पर्धेचे उद्घाटन रोहा, अलिबाग, मुरुड, चे राष्ट्रवादी चे विधानसभा अध्यक्ष  व रा  जी  प  माजी सदस्य  नंदकुमार म्हात्रे यांच्या शुभहस्ते झाले.                    

या वेळी रायगड भुषण व क्रिडा संघटक हिरामणजी भोईर. मुंबई उत्कर्ष मंड़ला चे अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे,हेमंत ठाकुर, संतोष भोईर, नथुराम ठाकुर चंद्रकांत तांबडे, पांडूरंग ठाकुर, विलास दिवकर  नरेश म्हात्रे, जग्गनाथ ठाकुर, गणेश मढवी दत्ताराम दिवकर व तरुण वर्ग उपस्थीत होते.              

यावेळी 100 कुस्त्या झाल्या प्रथम क्रमांक वाडगाव, दुत्रीय क्रमांक अंदोशी, तृतीय क्रमांक यशवंत खार  यांना मिळाला. तर क्रिकेट स्पर्धेत अमृतेश्वर चषकाचा माणकरी ठरला जय खंडोबा चोरडे, दृतिय क्रमांक भेरवनाथ इलेव्हन संघ यशवंतखार,  तृतीय क्रमांक जय भवानी आरे बुद्रुक  या संघांनी पटकविला.                    

या उत्सव सोहळ्यास आमदार अनिकेत तटकरे हे आवर्जून उपस्थीत राहिले त्यांचा यथोचित सन्मान ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. 
रात्री 9 वाजता श्री ची भव्य मिरवनुक पालखी सोहळा संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता यशवंतखार ग्रामस्थ, मुंबईकर मंडळ महिला वर्ग तरुण वर्गानी अथक परिश्रम घेतले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.