Press "Enter" to skip to content

माऊली दिव्यांग संघटनेची सामाजिक बांधिलकी

शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण शिबीर व शालेय वस्तुंचे वाटप

सिटी बेल • उरण •

माऊली दिव्यांग संघटना खोपटे
यांनी सामाजीक बांधिलकीच्या जाणिवेतून शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण शिबीर व परिक्षेसाठी शालेय वस्तुंचे वाटप केले.

ह्या प्रसंगी बांधपाडा ग्रामपंच्यायतीच्या सरपंच सौ. विषाखाताई प्रशांत ठाकूर, सुजीत म्हात्रे – उपसरपंच बांधपाडा ग्रामपंचायत, खोपटा अध्यक्ष विश्वनाथ पाटील आणि चेरमन राजन पाटील उपस्थीत होते.

ह्या प्रसंगी हरेश पाटील ह्यांनी ह्या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन करत मान्यवरांचा सत्कार व विद्यार्थीमित्रांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. माउली दिव्यांग संघटनेचे चार शिलेदार ज्यांच्या संकल्पनेतुन परिश्रमातुन हि कल्पना सत्यात आली ते म्हणजे विजय पाटील – अध्यक्ष, संतोष म्हात्रे, दिपक म्हात्रे,
संदिप पाटील यांनी मोलाचं सहाय्य करत ह्या कार्यक्रम यशस्वी केला.

ह्या प्रसंगी उपस्थित असणारे
शिक्षणतज्ञ मार्गदर्शक निवास गावंड, योगेश ठाकुर, कु कोमल पाटील
ह्यानी आपल्या मनोगतातुन माउली दिव्यांग संघटनेचे कौतुक केले.
विश्वनाथ पाटील अध्यक्ष ह्यांनी
माऊली दिव्यांग संघटनेचे संस्थापक
कै महादेव दादा ह्यांच्या आठवणींना उजाळा दिला व या कार्याचे गोडकौतुक केले. चेरमन राजन पाटील यांनी आपल्या हसतमुख संभाषण शैलीने
माउली संघटनेचा गुणगौरव केला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.