Press "Enter" to skip to content

पी.एन.पी. माध्यमिक शाळा काकलघर शाळेचा 10 वि चा निकाल १००%

सिटी बेल लाइव्ह / मुरुड / राजेश बाष्टे #

मुरूड तालुक्यातील काकलघर येथील प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक शाळेचा यंदाचा दहावी चा निकाल १००% लागला.
शाळेच्या विद्यार्थी कु.वैष्णवी संदीप नागावकर या विद्यार्थीनीने ८६.२० % टक्के गुण मिळवून शाळेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला .
कु.वैभव विराज भोईर या विद्यार्थ्याने ८०.४० % टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला , तर मानव उमेश पाटील या विद्यार्थ्याने ७८.८०% टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
कु.प्रतीक्षा दत्ताराम रामाणे ही विद्यार्थिनी अपंग असून तिने ७८.४० % टक्के गुण मिळवून चौथा क्रमांक मिळवीला असून तिची ही जिद्द पाहून तीच सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे , तसेच कु.सुजल संतोष नागोठकर या विद्यार्थ्याने ७६.४०% टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक पटकावला .
पि.एन.पी.माध्यमिक शाळा काकलघर शाळा समितीचे चेरमन संतोष गोमा कांबळी तसेच शाळा समितीचे सदस्य यांच्यासह शाळेच्या मुख्यध्यापिका मा. सौ.वैभवी वसंत मेहेतर मॅडम तसेच शाळेचे शिक्षक वृंद , शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पालक शिक्षक संघ यांच्या कडून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यात आलं . तसेच सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणीक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.