उरण पंचायत समितीच्या उपसभापतीपदी शिवसेनेचे हिराजी घरत
सिटी बेल • उरण • घन:श्याम कडू •
उरण विधानसभा मतदार संघातील उरण पंचायत समितीवर शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला आहे.शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य हिराजी घरत हे उपसभापती पदी विराजमान झाले आहेत.

शिवसेना- शेतकरी कामगार पक्ष व महाविकास आघाडी यांच्या सर्व पंचायत समिती सदस्य मार्फत हिराजी घरत यांची एकमताने निवड झाली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निष्ठावंत शिवसैनिक हिराजी घरत यांची उपसभापती पदी निवड झाल्याबद्दल शिवसैनिकांन मध्ये जोश निर्माण होऊन, सर्वांनी आनंद व्यक्त केला आहे.
उरण पंचायत समितीच्या माजी उप सभापती सौ.शुभांगी पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या प्रयत्नानी महाविकास आघाडी भविष्यात ही एकसंघ ठेवण्यासाठी हिराजी घरत यांना शेवटच्या टप्प्यात उप सभापतीपद द्यायचे ठरले होते.

या प्रसंगी हिराजी घरत यांना शुभेच्छा देण्यासाठी उप जिल्हाप्रमुख नरेशजी रहाळकर,पंचायत समितीच्या सभापती सौ.समिधा ताई म्हात्रे,माजी सभापती सागर कडू,माजी उप सभापती सौ. शुभांगीताई पाटील,वैशाली ताई पाटील उपस्थित होत्या.त्याचबरोबर शिवसेनेचे जि.प.सदस्य विजय भोईर,उरण शहर संपर्क प्रमुख गणेश म्हात्रे, के.एम.म्हात्रे, कमलाकर पाटील,एस के पुरव, मनोज पाटील,जगजीवन भोईर,रमेश म्हात्रे,जगजीवन नाईक, के.सी.गायकवाड,मेघश्याम कडू, किशोर कडू,शैलेश भोईर तसेच शे.का प.तालुका सह चिटणीस सुरेश पाटील, निलेश म्हात्रे,सीमा घरत, वैशाली सुतार, गणेश घरत, निलेश भोईर, अशोक म्हात्रे, सुरेश पाटील, मोठया संख्येने शिवसैनिक व महिला आघाडी उपस्थित होते.









Be First to Comment