Press "Enter" to skip to content

उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात

गुणवंत कामगार नरेश म्हात्रे यांच्या जीवनावरील पुस्तकाचे अध्यक्ष घनश्याम कडू यांच्या हस्ते प्रकाशन

सिटी बेल • उरण • प्रतिनिधी •

जेष्ठ साहित्यीक जे. एस. घरत यांनी गुणवंत कामगार नरेश म्हात्रे यांनी आजपर्यंत केलेल्या कार्यावर पुस्तक प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये नरेंद म्हात्रे यांनी कामगार व सामाजिक क्षेत्रात केलेल्या भरीव कार्याची उत्कृष्ट मांडणी व छपाई केली आहे. त्यामुळे नरेश म्हात्रे यांच्या कार्याची ही पोचपावतीच लेखक जे. एस. घरत यांनी दिली असल्याचे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार घन:श्याम कडू यांनी पुस्तकाचे उद्घाटन करताना केले.

कामगार क्षेत्रातील गुणवंत कामगार व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले नरेश म्हात्रे यांच्या जीवनपटावरील पुस्तक लेखक जेष्ठ साहित्यीक जे. एस. घरत यांनी लिहिले आहे. त्या पुस्तकाचे प्रकाशन उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू यांच्या हस्ते आज उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात संपन्न झाला.

यावेळी कार्याध्यक्ष संजय गायकवाड, चिटणीस रा. ऊ. म्हात्रे यांनी नरेश म्हात्रे यांच्या कार्याचा गौरव करून पुस्तकाच्या रूपाने त्यांच्या कार्याची महंती पोचविण्याचे काम लेखक जेष्ठ साहित्यीक जे. एस. घरत यांनी केले असल्याचे सांगितले. यावेळी उरण तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष विरेश मोडखरकर, चिटणीस अजित पाटील, सदस्य प्रवीण कोलापटे, पंकज ठाकूर, आशिष पाटील, विशाल गाडे, सुयोग गायकवाड, पूजा चव्हाण, रमेश ठाकूर, मुद्रक रवींद्र म्हात्रे आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.