Press "Enter" to skip to content

माथेरान मधील दिव्यांग व गरजू विधवा महिलांना मदतीचा हात

सिटी बेल लाइव्ह / माथेरान / मुकुंद रांजाणे #

माथेरान मध्ये मार्च पासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन जाहीर झाल्यापासून अनेक स्वयंसेवी संस्थांनी इथल्या नागरिकांना मदतीचा ओघ सुरू ठेवला होता. याचा लाभ अनेकांनी घेतला असून
माथेरान भारतीय जनता पक्षाच्या वतीने व श्रध्दा फाउंडेशनच्या माध्यमातून सुध्दा पूर्ण एक महिन्याचे चहा, नास्ता व अन्न धान्याचे किट वाटप करण्यात आले आहे.यावेळी येथील अत्यंत गरीब एकूण ५५ विधवा महिला व दहा दिव्यांग जे कमावते नाहीत अश्या गरजवंत यांच्यासाठी श्रद्धा फाउंडेशनने पुढाकार घेऊन मदत केली . डॉ,श्री, भरत वाधवाणी हे मॅगसेसे पुरस्कार प्राप्त झालेले असून तालुक्यात गरीब महिला व दिव्यांग व्यक्तींसाठी समाज कार्य अविरतपणे करित आहेत . सामाजिक अंतराचे भान व नियम अटी यांचे पालन करत ,भाजपचे वरिष्ठ नेते रमेशदादा मुंडे व नेरळ येथील भाजपचे प्रवीण पोलकम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम माथेरानचे प्रवेशद्वार दस्तुरी नाका येथे पार पडला .यावेळी संस्थेचे डॉ, अश्विनी परिहार, व समाजसेवक ध्रुव बडेकर ,सचिन म्हसे, सुलक्षणा अहिर, बसवराज, नितीश शर्मा व मदन नाथन हे सहभागी होते . माथेरान भाजप चे अध्यक्ष विलास पाटील ,उपाध्यक्ष सुभाष भोसले, संजय भोसले ,सचिव, तसेच माजी अध्यक्ष अरविंद शेलार, महिला आघाडी अध्यक्षा संध्याताई शेलार, युवा अध्यक्ष बाबू बर्गे अक्षय सोनवने,तसेच सर्व कार्यकर्ते व महीला कार्यकत्या उपस्थित होत्या तसेच माथेरान पोलिस स्टेशनचे निरीक्षक काळे व हेड कॉन्स्टेबल आनंद जोशी याचे विशेष सहकार्य केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.