Press "Enter" to skip to content

धाटावमधे साई मंदिराचा वर्धापनदिन साजरा

सिटी बेल • धाटाव • शशिकांत मोरे •

रोहा तालुक्यातील धाटाव येथील साईभक्त बाळकृष्ण रटाटे यांनी साईबाबांची श्रद्धा जपत बांधलेल्या साई मंदिराचा वर्धापनदिन नुकताच मोठ्या उत्साहात,थाटामाटात साजरा करण्यात आला.याप्रसंगी गावातून साईबाबांच्या पादुका पालखीची ग्रामप्रदक्षिणा करण्यात आली.या सोहळ्यात असंख्य साईभक्त सहभागी झाल्याचे पहावयास मिळाले.

सकाळी माजी सरपंच विनोद पाशिलकर यांच्या शुभहस्ते अभिषेक करण्यात आला.दुपारी होमहवन झाल्यानंतर सत्यनारायणाच्या महापूजेचा मान स्वप्नील शिंदे यांना सपत्नीक मिळाला.सायंकाळी हरिपाठ झाल्यानंतर रायगड भूषण हभप पुरुषोत्तम पाटील महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन झाले.

दरम्यान कीर्तनात तेची संत तेची संत,ज्यांचा हेत विठ्ठल.. नेनती काही टानेटोने,नामस्मरने वाचोनी.. काया वाचा आणि मने,झाले चींतने डुलती,निळा म्हणे विरक्त देही,आठवची नाही विषयांचा या नीलोबारायांच्या ओविवर कीर्तन करून प्रबोधन केले.

दुसऱ्या दिवशी संपूर्ण गावात साईबाबांच्या पादुका व प्रतिमेचे ग्रामप्ररदक्षिना करण्यात आली.दरम्यान ग्रामाप्रदक्षिनेत असंख्य साई भक्त तल्लीन होऊन नाचत होते.याठिकाणी लहान मुले,मुली व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.तर असंख्य साईभक्तांनी याठीकानी साई भंडाऱ्या दरम्यान महाप्रसादाचा लाभ घेतला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.