एस. व्हि. पी. एम. विद्यालयात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा
सिटी बेल • रोहा • समीर बामुगडे •
कळवा ठाणे येथील एस.व्ही. पी. एम संस्था संचालित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मराठी राजभाषा दिवस म्हणजेच मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 27 फेब्रुवारी हा दिवस म्हणजे ज्ञानपीठ वाजेते प्रसिद्ध ज्येष्ठ लेखक , कवी , कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिन. कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी तसेच मराठी भाषा दिवसाचे औचित्य साधून विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष ज्ञानदेव हांडे व राज्य सहसचिव भानुदास शिंदे हे लाभले होते.
कार्यक्रमाची सुरुवात कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विद्यार्थ्यांनी गायलेल्या पसायदानाने झाली. विद्यार्थीप्रिय कार्यकुशल शिक्षिका गौरी भोसले यांना सन्मानित करण्यात आले. मुख्याध्यापिका श्रीमती डाफी अँन्टोनी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. विद्यालयातील वरिष्ठ शिक्षिका ज्योती सावंत यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करत आभार प्रदर्शन केले.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मनीषा रावले, सारिका शिंदे, प्राची गोडांबे, मंशा यादव या शिक्षकांनी व लिपिक राणे यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.








Be First to Comment