Press "Enter" to skip to content

उरण शहरात पोस्ट ऑफिस कार्यान्वित

उरणकरांना दिलासा : शहरातील आनंदनगर येथे पोस्ट ऑफिस सुरू

सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •

उरण शहरातील कोटनाका येथील पोस्ट ऑफिसचे कार्यालय जीर्ण व मोडकळीस आल्याने सदर पोस्ट कार्यालय अनेक महिन्यापासून जेएनपीटी टाउनशिप येथे स्थलांतरीत झाले होते.त्यामुळे उरण शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांना यामुळे विविध त्रासाला सामोरे जावे लागत होते.पोस्ट ऑफिस जेएनपीटी येथे स्थलांतरित झाल्याने वेळ पैसा श्रम अधिक खर्ची घालावे लागत होते. जेष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव, शाळा कॉलेज मधील विद्यार्थी, महिला आदिंना त्रासाला सामोरे जावे लागत होते.

त्यामुळे उरण शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिक पोस्ट कार्यालयाच्या प्रतीक्षेत होते.उरण शहरातच पोस्ट ऑफिस कायमस्वरूपी राहावे अशी नागरिकांची मागणी होती.आता मात्र नागरिकांची ही चिंता मिटली असून उरण शहरातील गिरीराज अपार्टमेंट, प्लॅट नंबर 1, 2 B विंग, तळमजला आनंदनगर,उरण करंजा रोड येथे हे पोस्ट ऑफिस सूरू झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

उरण शहरात पोस्ट ऑफिस सुरु झाल्याने आता नागरिकांच्या वेळ, श्रम, पैशाची बचत होणार आहे. पंचायत समिती, पोलीस स्टेशन, नगर परिषद, तहसील कार्यालय, न्यायालय आदी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये आस्थापणे, शाळा कॉलेज जवळच असल्याने याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांसाह शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनाही होणार आहे.

सदर या पोस्ट कार्यालयाचे उदघाटन दिनांक 3/3/2022 रोजी सकाळी 10:30 वाजता शरण्या यु -डायरेक्टर पोस्टल सर्विस नवी मुंबई विभाग यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ अभिजित इचके सिनिअर सुप्रिडेंट, सुनील पवार -असिस्टंट सुप्रिडेंट, प्रशांत म्हात्रे -पोस्ट मास्टर उरण तसेच पोस्ट ऑफिस उरणचे अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.