Press "Enter" to skip to content

मराठा प्रिमियर लीग स्पर्धेत पेण पत्रकार संघ विजयी

सिटी बेल • पेण • वार्ताहर •

अखिल भारतीय मराठा महासंघ पेण आयोजित भव्य क्रिकेट सामने छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे आयोजित करण्यात आले होते. उद्घाटनीय सामना मराठा महासंघ विरुद्ध पेण पत्रकार संघ असा खेळवण्यात आला यात सामन्यात पेण पत्रकाराने उत्कृष्ठ खेळ करीत मराठा संघाचे पराभव करून पेण पत्रकार संघाने मराठा प्रिमियर लीगवर आपले नाव कोरले आहे.

अखिल भारतीय मराठा प्रिमियर लीग २०२२ च्या उद्घाटनीय मैत्रीपूर्ण लढतीत मराठा महा संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला मराठा महासंघाने चार षटकात ३१ धावा केल्या होत्या. यावेळी
पत्रकारांच्या संघातील गोलंदाज देवा पेरवी, विनायक पाटील, राजेश कांबळे यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली तर कमलेश ठाकूर यांनी चागल्या प्रकारे झेल घेत सर्वांनी चांगले शेत्ररक्षण केले. त्यामुळे मराठा महासंघाला ३१ धावांचा डोगर गाढता आला. मात्र पेण पत्रकार संघाने चौकार आणि षटकारची आतिषबाजी करत पेण पत्रकार संघानी दणदणीत विजयी मिळवला.

More from क्रिडाविश्वMore posts in क्रिडाविश्व »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.