मराठी भाषा दिनानिमित्त नवघर,पागोटे झोपडपट्टी येथे अन्न धान्य किट वाटप
सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •
मराठी भाषा दिनानिमित्त रविवार दि. 27/2/2022 रोजी चाईल्ड केअर सामाजिक संस्था, उरण रायगड तर्फे नवघर,पागोटे झोपडपट्टी येथे अन्न धान्य किट वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमा प्रसंगी मान्यवर म्हणून जयप्रकाश पाटील (अध्यक्ष -नवघर ग्रामस्त मंडळ ), विवेक भाई पाटील (अध्यक्ष -जाणता राजा प्रतिष्ठान पागोटे )तसेच चाईल्ड केअर संस्थेचे विकास कडू (संस्थापक, अध्यक्ष-चाईल्ड केअर ), विक्रांत कडू (कार्याध्यक्ष ),मनोज ठाकूर (उपाध्यक्ष ), कु रोशन धुमाळ, विपुल कडू (सदस्य ) हे उपस्थित होते.हा कार्यक्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष – विकास कडू यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.
आजवर पाच वर्षात चाईल्ड केअर संस्थेने आदिवासी वाड्यात, झोपडपट्टी, अनाथ आश्रम,येथे अन्न धान्य वाटप, मतिमंद मुलांना, गरीब गरजू मुलांना खाऊ, शैक्षणिक साहित्य वाटप असे अनेक समाज उपयोगी कार्यक्रम केले त्यात आनखी एक समाज सेवेचे कार्यात भर पडली. आपण समाजाचे देणे लागतो या ऋण भावनेतून चाईल्ड केअर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ज्यांच्या डोक्यावर साधे सावलीहि नाही अशा लोकांना आपण सर्वानी काहीतरी थोडी का होईना मदत करा. मदत म्हणून आमच्या संस्थे तर्फे छोटीशी ही मदत असल्याचे असे मत विकास कडू संस्थापक अध्यक्ष यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उरण मधील सुप्रसिद्ध सूत्रसंचालक विवेक पाटील यांनी केले. तर आभार प्रदर्शन संस्थेचे कार्याध्यक्ष विक्रांत कडू यांनी केले








Be First to Comment