कोळगाव येथे अवैधरित्या वाळू उत्तखनन : चार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
सिटी बेल • अलिबाग • अमूलकुमार जैन •
अलिबाग तालुक्यातील कोळगाव समुद्रकिनारी अवैधरित्या वाळू उत्तखननप्रकरणी चार आरोपीविरुद्ध मांडवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत मांडवा पोलीस ठाण्यात संदीप बाळासाहेब ढमढेले (वय-42वर्षे, तलाठी सजा धोकवडे, तालुका- अलिबाग) यांनी तक्रार केली आहे.याप्रकरणी एक ब्रास वाळूसाहित रु.10 लाख65 हजार 057/- किंमतीचा मुद्देमाल जप्त जप्त करण्यात आले आहे.
अलिबाग तालुक्यातील धोकवडे सजा अंतर्गत कोळगाव समुद्रकिनारी अवैधरित्या वाळू उत्तखनन करीत असल्याची माहिती तलाठी संदीप बाळासाहेब ढमढेले यांना मिळाली असता ते उपविभागीय दंडाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली किहीम तलाठी विनोद सुखदेव शिंगाडे,जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक कोल्हे,आणि इतर पोलीस कर्मचारी यांच्यासाहित कोळगाव गावाच्या समुद्र किनारी गेले असता तेथे समुद्रावर एक ट्रक, पिकअप जीप,मोटर सायकल,जेसीबी,व राजेंद्र लक्ष्मण पाटील,ऋतिक राजेंद्र पाटील(दोघेही राहणार-कोळगाव-अलिबाग),अशोक काशीनाथ चव्हाण (वायशेत-अलिबाग), अर्जुन रामचंद्र कोळी(मांडवा-अलिबाग) हे जेसीबीच्या साहाय्यानेसमुद्राची वाळू ट्रक मध्ये भरत असताना मिळून आले.
त्यांच्याकडे पथकाने वाळू उपसाचा परवानाबाबत आहे की काय याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे परवाना नसल्याबाबत सांगितले.यावेळी त्यांच्याकडून रु.305057/-किंमतीचा एक टाटा टेम्पो, रु.150000/-महेंद्र कंपनीचा पिकअप, 550000/-एक जेसीबी असा एकूण रु.1065057/-असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत मांडवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली असून अधिक प्रभारी पोलिस निरीक्षक राजीव सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.








Be First to Comment