Press "Enter" to skip to content

शासकीय आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा

कुसुम गावंड यांना शासकीय मदत मिळावी यासाठी आमदार महेश बालदी यांचे प्रयत्न

सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •

उरण तालुक्यातील वशेणी गावात 20 फेब्रुवारी 2022 रोजी श्रीमती कुसुम गावंड यांच्या घराला आग लागून सर्व सामान आगीत भस्मसात झाले. त्यामुळे कुसुम गावंड यांच्यावर आर्थिक संकट कोसळले. या कुटुंबाला मदत करण्याच्या दृष्टीकोणातून उरणचे आमदार महेश बालदी यांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याशी संपर्क साधला आहे. व सर्व हकीगत त्यांना सांगितली. लगेचच प्रवीण दरेकर यांनी श्रीमती कुसुम गावंड यांना शासनाकडून आर्थिक सहाय्य देणेबाबत योग्य ती कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कळवावा असा पत्रव्यवहार तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना केला आहे.

त्यामुळे गावंड कुटुंबियांना शासकीय आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गावंड कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी यासाठी आमदार महेश बालदी हे प्रयत्नशील असून उरण तालुका भाजपा उपाध्यक्ष मुकुंद गावंड हे देखील गावंड कुटुंबियांना शासकीय आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.