Press "Enter" to skip to content

लोकनेते मा.खा.रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत उटणे पाकिटावर पाणी वाचवा संदेश; केदार भगत यांच्यातर्फे दिवाळीनिमित्त सुवासिक उटणे वाटप उपक्रम


पनवेल/प्रतिनिधी:
​दिवाळीच्या सणानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही केदार भगत यांच्यातर्फे नागरिकांना सुवासिक उटण्याच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम गेल्या १०-१५ वर्षांपासून सातत्याने अविरतपणे सुरू आहे. विशेष म्हणजे, या वाटप करण्यात आलेल्या उटण्याच्या पाकिटांवर ‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’ हा अत्यंत मोलाचा संदेश मुद्रित करण्यात आला आहे.
​

या कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक हैप्पी सिंग, प्रतीक बहिरा, ब्रिजेश बहिरा, चेतन डुकरे, शेषनाथ गायकर, भावेश शिंदे व विजय बहिरा हे मान्यवर प्रमुख उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना लोकनेते मा.खा.रामशेठ ठाकूर यांनी मार्गदर्शन केले की, केदार भगत हा स्तुत्य उपक्रम सातत्याने राबवत असून, पाण्याचे महत्त्व ओळखून प्रत्येक नागरिकाने जलसंरक्षणाचा संकल्प केला पाहिजे. पाण्याचे महत्त्व सांगताना पाकिटावर नमूद केले आहे की, “पैशाने गोष्टी विकत घेता येतील, पण पाणी विकत घेऊन निसर्ग निर्माण करता येत नाही. जलसंरक्षण ही आजची गरज आणि उद्याची सुरक्षा आहे.” पाणी वाचवणे म्हणजे केवळ जलसंवर्धन नव्हे, तर येणाऱ्या पिढ्यांच्या भविष्याची हमी देणे होय, असा संदेश या माध्यमातून दिला जात आहे. हा उपक्रम यशस्वीपणे राबवल्याबद्दल लोकनेते मा.खा.रामशेठ ठाकूर यांनी केदार भगत यांच्या वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे कौतुक केले.

यावेळी नगरसेवक हैप्पी सिंग,विशालजी सावंत, प्रतीकजी बहिरा, ब्रिजेश बहिरा, चेतन डुकरे, शेषनाथ गायकर,भावेश शिंदे व विजय बहिरा आदी मान्यवर उपस्थित होते…

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.