महालन परिवर्तन संकल्प संस्थेतर्फे गावंड कुटुंबियांना आर्थिक मदत
सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •
उरण तालुक्यातील वशेणी येथे 20 फेब्रुवारी 2022 रोजी लागलेल्या आगीत समीर गावंड व कुंजवी गावंड यांचे संपूर्ण घर जळाले. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले. दुःखात बुडालेल्या या कुटुंबियांना मदत करण्याच्या दृष्टी कोणातून त्यांना आधार देत महालन परिवर्तन संकल्प संस्थे तर्फे समीर गावंड यांना एकूण 10,555 रुपयांची मदत करण्यात आली.
या कामी महालन परिवर्तन संकल्प संस्थेचे अध्यक्ष कुणाल अरुण पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला. यावेळी संस्थेचे विशाल पाटील, विवेक पाटील, विनय पाटील, प्रणय पाटील, अल्पेश म्हात्रे, कपील सिंग, सेतराज साकेत, दिपक मस्के, प्रथम तांडेल आदी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.








Be First to Comment