जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा
सिटी बेल लाइव्ह / खोपोली ( संतोषी म्हात्रे )
खालापूर तालुक्यातील होनाड, आत्करगांव ग्रामपंचायती रायगडचे शेवटच्या टोकावर असून येथील शेतकऱ्यांना आपला सातबारा मिळविण्यासाठी दोन तीन किलोमीटर पायपीट करीत साजगांव तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते. येथील नागरिकांची होणारी परवड लक्षात घेत जि.परिषद सदस्य नरेश पाटील,होनाड ग्रा.पं माजी सरपंच निकेश देशमुख तसेच आत्करगांव ग्रा.पंचायतीचे सदस्य समीर देशमुख यांनी १३ लाख रूपये खर्च करून सुसज्ज वातानुकूलित तलाठी कार्यालय उभेे केले आहे.रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते कार्यालयाचे लोकार्पण सोहळा आज पार पडला.
होनाड गावच्या गणपती विसर्जन घाटाजवळ वातानुकूलित सुसज्ज होनाड तलाठी कार्यालयाची इमारत उभारली असून लोकार्पण सोहळा कार्यक्रमासाठी जि.प.माजी सभापती तथा सदस्य नरेश पाटील,प्रांताधिकारी वैशाली परदेशी,तहसिलदार इरेश चप्पलवार,होनाड ग्रामपंचायतीच्या सरपंच अपर्णा निकेश देशमुख,माजी सरपंच निकेश देशमुख,आत्करगांव ग्रामपंचायतीचे सदस्य समीर देशमुख,अमोल देशमुख,संतोष पाटील,हेमंत पाटील,उपसरपंच महेश देशमुख यांच्यासह येथील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
होनाड तलाठी अभिजीत हिरवडकर यांनी लोकसहभागातून तलाठी कार्यालय उभे केले असून ते ज्या तलाठी सजा कार्यालयात जातात त्याठिकाणी लोकसहभागूत अशीच कार्यालय उभी करतात अशी माहिती जिल्हाधिकारी यांना तहसिलदार इरेश चप्पलवार यांनी देताच अशा कर्तव्यदक्ष तलाठी तीन महिण्याने बदली केल्यास जिल्ह्यातील सर्व कार्यालये सुसज्ज निर्माण होतील असे गौरवोद्गार काढले. होनाड येथील सुसज्ज वातानुकूलित कार्यालय तयार करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींंनी सहकार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी विशेष कौतुक केले आहे .
तर होनाड तलाठी कार्यालयाची इमारत बांधण्यासाठीचा प्रस्ताव तलाठी यांनी देताच आम्ही क्षणाचा विलंब न लावता इमारत बांधण्यासाठी तयारी दर्शवत जि.प.सदस्य नरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले असून दहा वर्षापुर्वी तालुक्यातील पहिले होनाड ग्रामपंचायतीचे कार्यालय वातानुकूलित बनविले त्याचपध्दतीने तलाठी कार्यालय उभे केले असल्याचा अभिमान होनाडचे माजी सरपंच निकेश देशमुख यांनी व्यक्त करीत येथील नागरिकांना मोठा फायदा होणार असल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.






Be First to Comment