Press "Enter" to skip to content

‘झी टॉकीजवर’ ‘इमेल फिमेल’

‘झी टॉकीज’ येत्या रविवारी २७ फेब्रुवारीला आपल्या प्रेक्षकांसाठी देणार ‘इमेल फिमेल’ या भन्नाट चित्रपटाची मेजवानी

सिटी बेल • मनोरंजन प्रतिनिधी •

निखळ मनोरंजनाची हमी घेत प्रेक्षकांना नानाविध कार्यक्रमांची व चित्रपटांची मेजवानी देणाऱ्या ‘झी टॉकीज’ने येत्या रविवारी २७ फेब्रुवारीला आपल्या प्रेक्षकांसाठी ‘इमेल फिमेल’ या भन्नाट चित्रपटाची मेजवानी आणली आहे. दुपारी १२.०० वा. आणि सायंकाळी ६.०० वा. या चित्रपटाचा आस्वाद ‘झी टॉकीज’ वाहिनीवर घेता येईल.

सोशल मीडीयाचा उपयोग चांगल्या कामासाठी होतोय, तेवढाच किंवा त्याहूनही खूप जास्त गैरवापर वाढतोय. ‘सोसेल तेवढंच सोशल’ असं सोशल मिडीयाच्या बाबतीत गमतीने म्हटलं जातं. सोशल मीडियाच्या वापराचा अनेकांचा फोकस सध्या चुकत चालला आहे. हाच विषय मध्यवर्ती ठेऊन सोशल मीडियाच्या आहारी जाऊन आपल्याच सदसदविवेकबुद्धीचा विसर पडलेल्या शंतनू कुलकर्णी या मध्यमवर्गीय गृहस्थाची व त्याच्या कुटुंबावर झालेल्या परिणामाभोवती ‘इमेल फिमेल’ चित्रपटाची कथा फिरते. सोशल मिडीयावर आपण काय बोलावं ? आणि काय बोलू नये ? मत व्यक्त करताना आणि माहिती पाठवताना योग्य ती पडताळणी न करता अनोळख्या व्यक्तीच्या चॅटिंगला न भुलणे याचे भान तरी प्रत्येकाला असणं गरजेचं आहे. हाच संदेश मनोरंजनाच्या माध्यमातून ‘इमेल फिमेल’ चित्रपटातून देण्यात आला आहे. मनोरंजनाला वास्तवाची जोड देत या चित्रपटातून मनोरंजनासोबत एका महत्त्वाच्या आणि गरजेच्या विषयावर भाष्य करण्यात आलं आहे.

निखिल रत्नपारखी, विक्रम गोखले, विजय पाटकर, दिप्ती भागवत, कांचन पगारे, प्राजक्ता शिंदे, सुनील गोडबोले, कमलेश सावंत, प्रतीक्षा जाधव, श्वेता परदेशी व बालकलाकार मैथिली पटवर्धन यांच्या ‘इमेल फिमेल’ चित्रपटात भूमिका आहेत.

‘झी टॉकीज’वर रविवारी २७ फेब्रुवारीला दुपारी १२.०० वा. आणि सायंकाळी ६.०० वा. प्रेक्षकांचं भरघोस मनोरंजन करण्यासाठी ‘इमेल फिमेल’ सज्ज आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.