Press "Enter" to skip to content

पॉंडेचरी तामिळनाडू येथे स्पर्धा संपन्न

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी दुसऱ्यांदा मास्टर “मि.भारत श्री २०२२” किताबाचे मानकरी

सिटी बेल • खालापूर • विकी भालेराव •

महामार्ग पोलीस केंद्र, चे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी यापूर्वी देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर शरीरसौष्ठव या प्रकारामध्ये चमकदार कामगिरी व घवघवीत यश संपादन करून परकीय भूमीवर भारताचा झेंडा फडकावला आहे.

इंडियन बॉडीबिल्डींग फेडरेशन यांच्यावतीने पॉंडेचरी तामिळनाडू या ठिकाणी २२ – २३ फेब्रू २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या “मास्टर भारत श्री २०२२” या शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये महामार्ग पाेलिस केंद्र पळस्पेचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी ८० किलो वरील गटामध्ये सुवर्णपदक पटकाविले आणि गौरवाची बाब म्हणजे हा किताब त्यांनी सलग दुसऱ्यांदा पटकाविला.

दि.१५ जुलै रोजी मालदीव येथे होणाऱ्या “मि.एशिया २०२२” या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी भारतीय संघातून निवड करण्यात आलेली आहे.‍ ते सध्या मि.ऑलिम्पिया सुनीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत.

More from क्रिडाविश्वMore posts in क्रिडाविश्व »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.