नागोठणे पोलिसांकडून गावठी दारूच्या चार हातभट्टी उध्वस्त
सिटी बेल • नागोठणे • महेश पवार •
नागोठणे परिसरातील जंगलांचा फायदा उचलत फोफावत चाललेल्या गावठी दारु तयार करणाऱ्या हातभट्टींना नष्ट करण्याची मोहिम नागोठणे पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक तानाजी नारनवर यांनी हाती घेतली असून त्याचाच एक भाग म्हणून नागोठणे पोलिस ठाण्याच्या हद्दितील चेराटी, काळकाई जंगल परिसरात धाड टाकून तेथील गावठी दारूच्या चार हातभट्टी उध्वस्त करण्याची मोहिम नागोठणे पोलिसांनी फत्ते केली आहे.
या कारवाईत प्लास्टिकचे १४ बॅरल व ४ लोखंडी टाक्या मिळून आल्या. त्यामधील ४० रुपये प्रतिलिटर प्रमाणे सुमारे ३०० लिटर गुळमिश्रित रसायन स्वरूपतील अंदाजे ५२ हजार रुपये किमतीचा हा मुद्देमाल वाहतुकीस अवजड व अवघड असल्याने नागोठणे पोलिसांच्या पथकाकडून जागीच पेटवून देण्यात येऊन जागेवरच नष्ट करण्यात आला आहे.
नागोठणे पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिस ठाण्यातील ठाणे अंमलदार व पोलिस पथकाने ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे. नागोठणे पोलिस ठाण्याच्या या पथकात पोलिस नाईक नितीन गायकवाड, पोलिस नाईक गंगाराम ढुमणे, महिला पो.ना. प्रतिक्षा गायकवाड, म.पो.ना नम्रता आयर, पो.काॅ. रामनाथ ठाकूर, पो.काॅ. अशिष पाटील, पो.काॅ. सत्यवान पिंगळे यांचा समावेश होता. नागोठण्याचे पो.नि. तानाजी नारनवर यांच्याकडून गावठी दारु विरोधात करण्यात आलेल्या या कारवाईचे नागरिकांतून स्वागत करण्यात येत आहे.








Be First to Comment