Press "Enter" to skip to content

गुटखा विक्री करणारे तीन आरोपी अटकेत

तळवडे येथे दोन लाख छप्पन हजारच्या गुटख्यासाहित सात लाखांची वाहने जप्त

सिटी बेल • अलिबाग • अमूलकुमार जैन •

अलिबाग तालुक्यातील तळवडे येथे दोन लाख छप्पन हजारच्या गुटक्यासाहित सात लाखांची वाहने जप्त करण्यात आली असून राकेश दिलीप जैस्वाल ( वय 32 वर्षे, राहणार- अण्णाभाऊ साठे नगर,गणेश कृपाचाळ, मानखुर्द,मुंबई),केतन कमलाकर घोगले(राहणार-तळवडे,तालुका-अलिबाग),अविद अहमद अन्सारी ( राहणार- वडखळ, तालुका-पेण) यांना अटक करण्यात आली आहे.याबाबतची फिर्याद पोयनाड पोलीस ठाण्यात फिर्याद विश्वजित विठ्ठल शिंदे,(वय 43 वर्षे,व्यवसाय नोकरी,अन्न सुरक्षा अधिकारी,पेण,सहाय्यक आयुक्त कार्यालय, अन्न व औषध प्रशासन,दुसरा मजला,श्रीयश प्लाझा,धरमतर, पेण )यांनी दिली आहे.

याबाबतची सविस्तर हकीगत अशी की,अलिबाग तालुक्यातील कार्लेखिंडी परिसरात तळवडे येथे शासनाने प्रतिबंधित केलेल्या पदार्थांची वाहतूक होणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त लक्ष्मण दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वजित विठ्ठल शिंदे यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसहित सापळा रचला होता.राकेश दिलीप जैस्वाल,( वय 32 वर्षे,राहणार-अण्णाभाऊ साठे नगर,गणेश कृपाचाळ, मानखुर्द,मुंबई)यांच्या
तळवडे येथील घराच्या अंगणामध्ये
छापा टाकला असता आरोपी यांच्याकडे
त्यांना विमल पान मसाला रु.74800/- विमल सुगंधी तंबाखू रु.13200/-गोवा गुटखा रु.168000/-,पाच लाख रुपये किंमतीची फोर्ड फेस्ता कार,दोन लाख रुपये किंमतीचा टाटा टेम्पो,एकूण 956000/- असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

त्यासोबत केतन कमलाकर घोगले (राहणार- तळवडे,तालुका-अलिबाग),अविद अहमद अन्सारी( राहणार-वडखळ,तालुका-पेण) यांनाही अटक करण्यात आली आहे.आरोपी यांनी प्रतिबंधित केलेले अन्न पदार्थ गुटखा पान मसाला,सुगंधी तंबाखू, खाल्ल्याने जीवितास धोका निर्माण होतो.याबाबत माहिती असूनही प्रतिबंधित केलेले अन्न पदार्थ साठवणूक,पुरवठा,वाहतूक,व वितरण करीत शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा स्वतःच्या ताब्यात बाळगल्या स्थितीत मिळून आला आहे.याबाबत पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आतिग्रे हे करीत आहेत.

राकेश दिलीप जैस्वाल,केतन कमलाकर घोगले,अविद अहमद अन्सारी यांना अलिबह येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना 25 फेब्रुवारी2022 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.