समीर गावंड कुटुंबाला रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांची आर्थिक मदत
सिटी बेल • उरण • घन:श्याम कडू •
उरण तालुक्यातील वशेणी गावात रविवार दिनांक 20 फेब्रुवारी 2022 रोजी.श्री समीर रामकृष्ण गावंड व कुंजवी रामकृष्ण गावंड यांच्या घराला. संध्याकाळी 7 च्या सुमारास आग लागली होती. या आगीत या कुटुंबाचे संपूर्ण संसाराची राखरांगोळी झाली आहे. संपूर्ण घर बेचिराख झाले आहे. हे कुटुंब पुर्णपणे उध्वस्त झाले आहे.

आज रायगड जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी वशेणी गावात जाऊन अपघातग्रस्त कुटुंबाची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी या कुटुंबाला आर्थिक मदत देखील केली. तसेच तातडीने संबंधीत शासकीय अधिकाऱ्यांना फोन करून या कुटुंबाला शासनस्तरावरील मदत करण्याच्या सुचना देखील केली.

यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे सद्स्य बाजीराव परदेशी, उरण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद म्हात्रे, रायगड जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस महेंद्र ठाकूर, वशेणीचे सरपंच जिवन गावंड, कोप्रोली काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विवेकानंद म्हात्रे व मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment