आणखी सहा जणांचा सहभाग : आरोपींना अटक
सिटी बेल लाइव्ह / रायगड : समिर बामुगडे #
रोहा तालुक्यातील तांबडी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक आणि संतापनजक घटनेने आता नवे वळण घेतले आहे. या गुन्ह्यात आणखी सहा जणांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या बारा तासात एका आरोपीला अटक देखील केली होती. पण खेळाडू असलेल्या या मुलीवर एक व्यक्ती अत्याचार करून तिची हत्या करू शकत नाही असा संशय तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला होता. दुदैर्वी मुलगी खेळाडू होती. कबड्डी, कराटे खेळणारी होती, त्यामुळे तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला असावा असा अंदाज तिच्या कुटुंबियांनी व्यक्त केल्याची भावना विरोधी पक्षनेते दरेकर यांनी व्यक्त केली होती.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने आपल्यासोबत अजुन सहा जण असल्याची कबुली दिली. यामध्ये एक अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. यांनतर पोलिसांनी आरोपींना अटक केली असून त्यांनीही पहिल्या आरोपी सोबत या गुन्ह्यात सहभागी असल्याची कबुली दिली आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणशाखेचे पोलीस निरीक्षक जमील शेख हे करीत आहेत.






Be First to Comment