बाई बाई… मोराचा पिसारा उरणच्या रस्त्यावर फुलला !
सिटी बेल • उरण • वैशाली कडू •
तालुक्यातील केगांव परिसरात मोराचे आगमन झाले आहे. केगांव येथील रहदारीच्या रस्त्यावर सायंकाळी मोर बागडत असल्याचे दिसून आले.
तालुक्यातील केगांव परिसरात दरवर्षी मोरांचे दर्शन या परिसरातील जनतेला होत आहे. आज सायंकाळी रहदारीच्या रस्त्यावर माणसांची वर्दळ कमी असल्याकारणाने मोराचे आगमन झाले.
केगांव बाजारपूर येथील अरविंद पवार हे सायंकाळी ५ ते ६ च्या दरम्यान या रस्त्यावरून फेरफटका मारण्यासाठी जात असताना त्यांच्या नजरेस मोर बागडत असताना दिसला. मोराला चाहूल लागताच तो उडून गेला होता. तो पर्यंत अरविंद पवार यांनी आपल्या मोबाईलमध्ये मोराचा फोटो घेण्यात यशस्वी झाले होते.








Be First to Comment