Press "Enter" to skip to content

खोपटे येथे हळदीकुंकू समारंभ संपन्न

शिवसेना महिला पदाधिकारी रणरागीणी हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

सिटी बेल • उरण •

शिवसेना महिला पदाधिकारी उरण पुर्व विभाग रणरागीणी हळदी कुंकू समारंभ आज खोपटे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या प्रसंगी सौ.रेखाताई ठाकरे जिल्हा महिला संघटक , सौ.मालतीताई मनोहरशेठ भोईर , श्रीमती सुजाता गायकवाड महिला तालुका संघटक व मान्यवरांनी आपले विचार मांडून महिलांनी येणार्या काळात शिवसेना पक्ष मजबूत करण्यासाठी काम कराव ह्या साठी मार्गदर्शन केले.

सौ.भावना कैलास म्हात्रे यांनी प्रास्ताविक करून महिलानी खंबीरपणे कामे करून आपण केलेल्या कामाची पद्धत व आमदार मनोहर शेठ भोईर व खासदार श्रीरंग बारणे यांनी विकासकामे करण्यासाठी केलेल्या मदतीबद्दल आभार मानले . कोवीड काळात सेवाबजवणार्या आशा सेविका व अंगणवाडी सेविकांचा विशेष सत्कार करण्यात आला.

सौ.ममता पाटील यांनी महिलांच्या धवला गायन , उखाणा घेणे अशा विविध प्रकारच्या स्पर्धा घेवून मनोरंजन केले. उरण पुर्व विभागातील 500 महिला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. सौ.ज्योती म्हात्रे यांनी मान्यवरांचे स्वागत केले व सौ.प्रणिता म्हात्रे यांनी आभार प्रदर्शन केले. ह्या प्रसंगी शिवसेना महिला तालुका पदाधिकारी, महिला सरपंच, सदस्य., युवातीसेना, विभाग प्रमुख व महिला शिवसैनिक रणरागीणी उपस्थिती होत्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.