सिटी बेल लाइव्ह / रायगड / अमूलकुमार जैन #
महसूल दिनाचे औचित्य साधून अलिबाग येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात आई फाउंडेशनच्या पंधरा सदस्यांनी रक्तदान करून महसूल दिन साजरा केला.
याबाबत आई फाउंडेशनचे उपाध्यक्ष सागर पवार यांनी सांगितले की, आई फाउंडेशन ही संस्था नसून सेवाभावी कार्य करणारी अग्रेसर संस्था आहे.आई फाउंडेशनचे संस्थापकीय अध्यक्ष राजेंद्र साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था सामाजिक कार्य करीत आहेत.महसूल दिनाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून फाऊंडेशनच्या सदस्यांनी यात सहभागी होऊन 15 सदस्यांनी आपले रक्त दान केले त्यामुळे महसूल विभागाकडून नाही फाऊंडेशनचे कौतुक करण्यात आले आहे.






Be First to Comment