Press "Enter" to skip to content

पागोटे येथे शिवजयंती साजरी

जाणता राजा प्रतिष्ठाण-पागोटे च्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती

सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •

पागोटे गावात शिवजयंती उत्सव मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली.जाणता राजा प्रतिष्ठाण-पागोटे व सर्व शिवप्रेमी यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी मोठ्या आनंदात उत्साहात साजरी करण्यात आली.

पागोटे येथे हुतात्मा रंगमंच येथे शिवप्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली.व शिवरायांच्या जय घोषात पूर्ण परिसर दुमदुमन गेला. संध्याकाळी 6 वाजता पागोटे गावात भव्य पालखी मिरवणुक काढण्यात आली . लहान मुलांसाठी फेन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करून त्यांना बक्षिसे देण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.