उरण तालुक्यातील मुळेखंड कोळीवाडा आणि कुंभारवाडा (चाणजे उरण ) येथे संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियान
सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •
जेष्ठ नागरिक मंडळ आणि लिवी टीमच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त उरण तालुक्यातील मुळेखंड कोळीवाडा आणि कुंभारवाडा (चाणजे उरण )येथे संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियाना अंतर्गत गावात सामाजिक बांधिलकी जपत साफसफाई करण्यात आली.
यावेळी जेष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश म्हात्रे, कार्याध्यक्ष अनंत पाटील, लिवी टीमचे सीईओ जुगनू कोळी, एचओडी हंडोरे सर, प्रोफेसर किरण घुमारे, लिवी टीमचे सर्व मेंबर, गाव अध्यक्ष जयराज म्हात्रे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. लिवी टीम व जेष्ठ नागरिक मंडळ यांच्या वतीने शिवजयंती दिनी स्वच्छताचे कार्य केल्याने या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.








Be First to Comment