Press "Enter" to skip to content

नविन शेवा गावात शिवजयंती साजरी

युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा – मनोहरशेठ भोईर

सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •

नविन शेवा गावात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून गावातील शिवराय युवा मंडळ यांनी दरवर्षी प्रमाणे यावर्षीसुध्दा मोठ्या उत्साहात साजरी केली.

कोरोनामुळे दोन वर्ष शिवजयंती उत्सव साध्या पध्दतीत साजरा केला होता परंतु यावर्षी शासनाच्या नियमाचे पालन करून शिवजयंती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला होता त्यामध्ये लहान मुलांनी वेशभुषा करून कार्यक्रमाची शोभा वाढवली, तसेच मंडळाकडून एक सत्कार करण्यात आला होता.त्यामध्ये मुलगी कु.मानसी प्रदिप घरत ही गावात पहिली CA झाली असल्यामुळे तिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच लहान मुलांनी शिवरायांच्या इतिहासावर भाषणे करून शिवविचार मांडला.

शिवजयंती उत्सवासाठी माजी आमदार मनोहरशेठ भोईर उपस्थित राहुन शिवभक्तांना आपले विचार मांडत असताना महाराजांच्या इतिहासाची आठवण करून युवकांनी महाराजांचा आदर्श घ्यावे असे आवाहन केले . शिवजयंती उत्सवात गावचे सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये चंद्रकांत शेठ घरत, दयालशेठ भोईर, हिराजी घरत, पंडित शेठ घरत, कमळाकर पाटील, आदिनाथ भोईर, निशांत घरत, शैलेश भोईर, राजण घरत, किसन म्हात्रे, वनिता म्हात्रे, हेमंत म्हात्रे, मनोहर पाटील, श्रेयश घरत, महेश म्हात्रे, पंढरीनाथ घरत, कृष्णा घरत व सर्व ग्रामपंचायत सदस्य आणी शिवभक्त मोठ्या संख्येने होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.