दोन जण जागीच ठार, एक जण अतीगंभीर : घटनास्थळी तातडीने कोलाड पोलीस दाखल
सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम )
मुबंई गोवा महामार्गावर कोलाड येथे मोठा आपघात झाला असून यात दोन जण जागीच ठार तर एक जण अतीगंभीर झाल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली आहे.
या घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत तायडे हे तातडीने त्यांच्या सहकारी घेऊन घटनास्थळी दाखल झाले. या तिघांना माणगांव रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात पाठले असता दोघांचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाल्याने त्यास पेण येथे पाठवण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक तायडे यांनी दिली.
मिळालेल्या माहिती नुसार इंदापूर कडून नागोठणे कडे जाणारा टँकर नंबर एम एच 043 वाय 4345 हा मुबंई कडे जात होता. तर एम एच 06 बी एक्स 0513 ही मोटर सायकल मुबंई कडून इंदापूर कडे जाणारी कार एम एच 46 ए डी 4285 ला धडकल्याने मोटारसायकल वर प्रवास करत असलेले तिघे प्रवासी मुबंई कडे जाणार टँकरखाली आले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याची माहिती कोलाड पोलीस स्टेशनमधून मिळाली.






Be First to Comment