Press "Enter" to skip to content

उरणच्या वशेणी गावात अग्नीतांडव

वशेणी गावात घराला आग लागून पूर्ण घर जळून खाक

पहा या अग्नीतांडवाचा व्हिडिओ 👇

सिटी बेल • वशेणी – उरण • अजय शिवकर •

उरण तालुक्यातील वशेणी गावात घराला अचानक आग लागून पूर्ण घर जळून भस्मसात झाले.

वशेणी गावातील समिर रामकृष्ण गावंड खालची आळी हे आपली आई, पत्नी व दोन मुली समवेत राहत आहेत ,या पैकी कुणीही घरात नसताना रविवारी साडेसातच्या सुमारास घराला अचानक आग लागली.

अचानक लागलेल्या आगीला विझवीण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ व तरूणांनी अग्नीशमक दलाची गाडी येई तोवर प्रयत्नांची पराकाष्ठा केली,परंतु घर पूर्ण जळून गेले सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. घटनास्थळी पोलिसांनी जाऊन पाहणी केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.