
युवा नेते संदीप म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
सिटी बेल लाइव्ह / कळंबोली #
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश युवा सचिव संदीप म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांना कोरोना विषयी जनजागरण व जनतेस करावयाची मदत यासंदर्भात मार्गदर्शन शिबिर न्यू इंग्लिश स्कूल कळंबोली या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमास पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सतीश पाटील, दर्शन ठाकूर अध्यक्ष पनवेल विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प्रसाद पाटील जिल्हा सहसचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पनवेल विधानसभा युवा अध्यक्ष सुनील ढेंबरे, मंगेश नेरुळकर कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टी पनवेल शहर जिल्हा, अनुराग गायकवाड,विनाेद सुपे, विकास पाटील, महेश पाटील, हितेश नेरूळकर,बजरंग म्हात्रे , प्रभाकर फडके, सिराज खान इत्यादी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी सतीश पाटील यांनी कार्यकर्त्यांना कोरोनाच्या परिस्थितीशी मुकाबला करण्यासंदर्भात घ्यावयाची काळजी व जनतेला या आपात्कालीन परिस्थितीत कसे सहकार्य करावे यासंदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. याशिवाय पक्षाची ध्येयधोरणे, शरद पवार साहेबांचे योगदान, अजितदादा पवार,पार्थ पवार, अदिती तटकरे यांचे कार्य व विचाराचा थोडक्यात आढावा सतीश पाटील यांनी घेतला व ईदच्या शुभेच्छा मुस्लिम बांधवांना दिल्या.
यावेळी संदीप म्हात्रे, सुनिल ढेंबरे व मंगेश नेरुरकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
दर्शन ठाकूर व प्रसाद पाटील यांनी देखील संदीप म्हात्रे यांना शुभेच्छा देऊन युवकांना सामाजिक कार्यासाठी मार्गदर्शन केले.






Be First to Comment