Press "Enter" to skip to content

प्रदर्शनाचे माध्यमातून आरोग्यदायी आहाराची माहिती

श्रमिक विद्यालय चिल्हे येथील विद्यार्थ्यांनी सादर केले प्रदर्शन

सिटी बेल • खांब-रोहे • नंदकुमार मरवडे •

नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब या शिक्षण संस्थेच्या श्रमिक विद्यालय चिल्हे येथील विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाचे माध्यमातून आरोग्यदायी आहाराची माहिती देऊन सद्रुढ शरीरासाठी पोषक आहार कसा आवश्यक आहे याबाबत माहिती दिली.

शालेय विविध उपक्रमातर्गत विद्यार्थी वर्गाने सदरचा उपक्रम विद्यालयात राबविण्यात आला.या उप्रमातंर्गत विद्यार्थी वर्गाने स्वतः विविध भाज्या,फळे आणून त्यांची व्यवस्थितपणे कापून डिशमध्ये रचना करून ठेवण्यात आली. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे जंक फुडपेक्षा हेल्दी फुड आरोग्यासाठी फायदेशीर असून आपण आपल्या आहारात केवल हेल्दी फुडचाच वापर करावा.हाच संदेश या उपक्रमाचे माध्यमातून देण्यात आला. तर विविध स्लोगन व सुविचारांच्या मदतीनेही याबाबत अधिक माहिती देण्यात आली.

हेल्दी फुडबाबत विद्यार्थी वर्गाने राबविलेल्या या उपक्रमाबाबत मुख्याध्यापक दीपक जगताप यांनी विशेष शब्दात कौतूक करून समाधान व्यक्त केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.