केळवणे प्राथमिक विद्यालय व जय महाराष्ट्र गृप यांच्या कडून छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
सिटी बेल • उरण •
पनवेल तालुक्यातील केळवणे गावात प्राथमिक विद्यालय व जय महाराष्ट्र गृप यांनी मोठ्या हर्ष आणि उत्साहाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली.
शाळेतील कित्येक विद्यार्थ्यांनी भाषणे व समूहगाण सादर करून संपूर्ण वातावरण शिवमय केले तसेच शिक्षक वर्गाने या प्रसंगी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले.

केळवणे येथे जाणता राजा गृप दरवर्षी तिथिप्रमाणे मोठ्या भव्यदिव्य स्वरूपात शिवजयंती साजरी करतेच आहे पण तारखेप्रमाणेही जय महाराष्ट्र गृपचे सर्व सदस्य व ग्रामस्थांनी मिळून हर्ष व उत्साहाने शिवजयंती साजरी केली.








Be First to Comment