Press "Enter" to skip to content

उरणमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

सिटी बेल • उरण • वैशाली कडू •

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त शिवप्रेमींनी अभिवादन केले. उरणमध्ये विविध गड, किल्ल्यांसह सर्वत्र सार्वजनिक शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवरायांचे आठवावे रुप, शिवरायांचा आठवावा प्रताप, यानुसार शिवप्रेमींमध्येे उत्साह संचारला होता. अनके ठिकाणी सामाजिक उपक्रमसुद्धा शिवजयंतीनिमित्त घेण्यात आले.

यावेळी मिरवणुका, शिवरायांच्या पुतळ्यांचेही पूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उरण नगरपरिषदेच्या वतीने शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास तसेच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण केले.

शिवजयंती निमित्त उरण तालुक्यात व शहरातील शिवप्रेमींत उत्साह संचारला होता. प्रत्येक गावात शिवजयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली होती. आज प्रत्येकांनी आपल्या गाडीवर व घरात शिवाजी महाराजांचे फोटो असलेले झेंडे फडकत असल्याने उरण शहरातील व तालुक्यातील वातावरण भगवेमय झाले होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.