Press "Enter" to skip to content

गोखले महाविद्यालय श्रीवर्धन येथे शिवजयंती उत्साहात संपन्न

सिटी बेल • श्रीवर्धन • केतन माळवदे •

येथील गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय श्रीवर्धनच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाराष्ट्राचे दैवत, कुलभूषण, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने विविध विषयांवर निबंध स्पर्धा व कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

या प्रसंगी महाविद्यालयाचे एन. एस. एस. विभाग प्रमुख व इतिहास विभाग प्रमुख आणि जेष्ठ प्राध्यापक, किशोर लहारे यांच्या हस्ते, शिव प्रतिमा पुजन करण्यात आले.

यावेळी एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी, प्राध्यापक वाल्मिक जोंधळे , काॅमर्स विभाग प्रमुख, डॉ. कल्याणी नाझरे , अकांऊट विभागाचे प्राध्यापक राजीव गोरुले , अर्थशास्त्राचे प्राध्यापक, योगेश लोखंडे , मराठी विभागाचे प्राध्यापक संतोष लंकेश्वर , महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक, बाक्कर आणि सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, स्वयंसेवक सहभागी झाले होते.या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. श्रीनिवास जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.