फार्मसी महाविद्यालयाचा डिप्लोमा प्रथम वर्ष निकाल पहिल्याच वर्षी शंभर टक्के
सिटी बेल लाइव्ह / कर्जत ( संजय गायकवाड )
कर्जत मधील कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयाचा डिप्लोमा विभागाचा प्रथम वर्षाचा निकाल यंदा पहिल्याच वर्षी शंभर टक्के लागला असून बहुतांश विद्यार्थ्यानी 75 टक्केच्या वर गुण मिळविले आहेत.
या फार्मसी महाविद्यालयाने गेल्या वर्षी फार्मसी डिप्लोमाचा अभ्यासक्रम सुरू केला. यंदा पहिल्याच वर्षी प्रथम वर्षात शिकणारी विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकाल लावून महाविद्यालयाच्या मुकुटात मानाचा तुरा रोवला आहे.
यामध्ये सर्वप्रथम येण्याचा बहुमान कु. हर्षला तुपे हिने 88.64 टक्के गुण मिळवून पटकावला आहे. द्वितीय क्रमांक कु. ऋतुजा आंबेकर हिने 86.09 टक्के गुण संपादन करून मिळविला असून तृतीय क्रमांक कु. प्रविणकुमार चौधरी या विद्यार्थ्याने 84.91 टक्के गुण मिळवून मिळविला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे.






Be First to Comment