Press "Enter" to skip to content

श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल जासई मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

सिटी बेल • उरण • वैशाली कडू •

रयत शिक्षण संस्थेचे श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्युनिअर कॉलेज जासई विद्यालयात महाराष्ट्राचे आराध्यदैवत, युगपुरुष, क्षत्रिय कुलवंत श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात संपन्न झाली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, कामगार नेते, भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश पाटील व विद्यालयाचे चेअरमन अरुण जगे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी प्रांगणात असलेल्या विविध महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले, शिवजयंती निमित्त विद्यालयात पथनाट्य, पोवाडे, विविध वेषभूषा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. या कार्यक्रमास व्हाईस चेअरमन रामभाऊ घरत,नरेश घरत,मधुकर पाटील, अमृत ठाकूर,यशवंत घरत,पद्माकर घरत,रमेश पाटील, विवेक म्हात्रे, सुभाष घरत,सुनील घरत,गोविंद घरत,विद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर श्री.अरुण घाग,उपमुख्याद्यापक मोरे सर,पर्यवेक्षक साळुंखे सर,सर्व सेवक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यालयाचे प्राचार्य अरुण घाग यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याची महती सांगितली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रयत सेवक संघाचे महाराष्ट्राचे समन्वयक नुरा शेख यांनी केले, विद्यार्थी पथनाट्य वेषभूषा यांचे नियोजन सौ.घरत पी.जे यांनी केले तर आभार उपमुख्याध्यापक मोरे सर यांनी मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.