आज कोरोनाचे २७ नवे रुग्ण
रोहा कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५९१ : मृतांची संख्या १५ वर
सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम )
रोहा तालुक्यात कोरोनाचा विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून आज २७ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असुन मृतांची संख्या १५ वर गेली आहे. तर कोरोना बाधितांची एकूण संख्या ५९१ वर पोहचली असुन लोकांची धास्ती अधिक वाढलेली आहे.
आज १ ऑगस्ट रोजी मिळालेल्या माहिती नुसार आज एकाच दिवशी पुन्हा २७नव्या रुग्णांचा समावेश असुन एकूण रुग्णांची संख्या ५९१वर तर आज पर्यंत ४२७जण बरे झाले असून १४९जणांवर उपचार सुरु असून सर्वाधिक रुग्ण हे रोहा शहर भागात आणि वरसे भुनेश्वर तसेच नागोठणे विभाग या हद्दीतील कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्यामुळे व बळीची संख्या १५ पोहचल्याने ग्रामीण भागातीलच रुग्णांचा बळी गेल्याने नागरिकांची धास्ती वाढली आहे.






Be First to Comment