Press "Enter" to skip to content

दुर्ग मावळा प्रतिष्ठान, उरण यांच्या वतीने

द्रोणागिरी गडावर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

सिटी बेल • उरण • सुनिल ठाकूर •

दुर्ग मावळा प्रतिष्ठान, उरण यांच्या वतीने सालाबादप्रमाणे शनिवार दिनाकं 19 फेब्रुवारी 2022 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती द्रोणागिरी गडावर साजरी करण्यात आली, त्यानिमित्त गडावर शिवछत्रपती शिवरायांच्या जीवनावर ऐतिहासिक व्याख्यान, गायन, पोवाडे व महाराजांची पालखी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी माजी आमदार मनोहर भोईर, शिवसेना उरण विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत, उपतालुका संघटक अमित भगत, उपतालुका संघटक के एम घरत, चिरनेर विभागप्रमुख अनंत पाटील, दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे गिरीश पाटीलसर, चेतन गावंड, प्रांजळ पाटील, भुपेंद्र पाटील, केतन भोईर, राज म्हात्रे, कुणाल म्हात्रे, प्रीतम पाटील, प्रकाश कावळे, महेंद्र गावंड, टेमकरसर, राजू ठाकूर, जगदीश भोईर, चंद्रशेखर भोमकर, सतीश जुनपुरे, चंद्रकांत कांबळे, गणेश भोईर, अरुण म्हात्रे, ऋषिकेश किल्लेकर, योगेश म्हात्रे, विवेक केणी, सतीश लोकरे, पदाधिकारी , महिला कार्यकर्त्या, कार्यकर्ते तसेच शिवप्रेमी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.