Press "Enter" to skip to content

स्वराज्य सामाजिक संस्था कर्जत यांच्या वतीने

कर्जतमध्ये कर्मवीर भाऊसाहेब राऊत यांची 118 वी जयंती उत्साहात साजरी

सिटी बेल • कर्जत • संजय गायकवाड •

स्वातंत्र्य सेनानी कुलाबा जिल्ह्याचे माजी खासदार स्वातंत्र्यत्रपूर्वी काळातील कर्जत चे आमदार कर्मवीर भाऊसाहेब राऊत यांची 118 वी जयंती आज दि.19 फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब राऊत चौक कर्जत येथे स्वराज्य सामाजिक संस्था कर्जत यांच्या वतीने साजरी करण्यात आली.

कर्मवीर भाऊसाहेब राऊत यांचा पणतू रोहन राऊत यांच्या हस्ते चौकाचे पूजन केले. डॉ रमेश पोवार यांनी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे माजी विस्तार अधिकारी जी. एस. म्हात्रे यांनी भाऊसाहेब राऊत तर स्वराज्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष भगवान धुळे यांच्या हस्ते हुतात्मा भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन केले. गुजरात मधील एका कंपनीचे व्यवस्थापक महेश कोळंबे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचा शुभारंभ केला.

इतिहास संशोधक वसंत कोळंबे यांनी कर्मवीर भाऊसाहेब राऊत यांच्या बद्दल माहिती दिली. रोहन राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. विजय कोंडीलकर यांनी तर आभार प्रदर्शन संतोष कोळंबे यांनी केले. या कार्यक्रमाला स्वराज्य सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष सविता कोळंबे, सचिव रोहिदास लोभी, जगदीश जाधव, टी. आर. पाटील, दत्ता कोळंबे डॉ. पवार, सिद्धार्थ ढोले, विशाल माळी, रघुनाथ विभार, रेश्मा ठोंबरे, साईनाथ श्रीखंडे आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.