रसायनीत ठिकठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •
महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एक सामाजिक उपक्रम म्हणून रसायनी परिसरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रम पार पडले.रिस हाॅस्पिटलात मोफत आरोग्य शिबिर तर शालेय विद्यार्थ्यांनी मिरवणूक काढून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.
रिस येथील रिस हाॅस्पिटल आणि मानवहित लोकशाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा झोंबाडे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. या शिबिराचा 42 नागरिकांनी लाभ घेवून शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या शिबिरात रुग्णांना रिस हाॅस्पिटलचे तज्ञ डाॅक्टर मंगेश बांग यांनी मार्गदर्शन करुन रोगाचे निदान केले.परिसरातील मोहोपाडा, चांभार्ली,वावेघर आदी ठिकाणी महाराजांच्या प्रतिमेचे अभिषेक करुन पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले.

यावेळी मोहोपाडा मुख्य बाजारपेठेत सर्वंत्र जाणता राजाचे ध्वज फडकल्याचे दृश्य पाहताना परिसरात भगवे वादळ उठल्याचे दिसून आले.तसेच एचओसी काॅलनीतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अभिषेक व इतर कार्यक्रम परिसरातील तरुण युवकांनी वर्गंणी काढून कार्यक्रम साजरा केला.यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.

त्याचप्रमाणे मोहोपाडा येथील प्रबळ शाळेतील विद्यार्थ्यांनी दांड रसायनी रस्त्यावरील प्रबळ शाळा ते मोहोपाडा नवीन पोसरी ‘जय भवानी जय शिवाजी’ गजरात मिरवणूक काढली.या मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी बाळ शिवाजी,मावळे असा वेष परिधान केला होता.रसायनी परिसरात शिवजयंती निमित्त कायदा व सुव्यवस्था निर्माण होवू नये यासाठी,रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त होता.








Be First to Comment