बोरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुधीर पाटील यांची बिनविरोध निवड
सिटी बेल • पेण • वार्ताहर •
पेण तालुक्यातील बोरगांव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुधीर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. याआधीचे सरपंच यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते त्यानंतर आज या पदासाठी निवडणूक घेण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुशांत खाकर, काशिनाथ केवारी, सोमी केदारी, सोमा पारधी, संगिता वाघमारे, सीता वाघमारे, सुशिला पाटील, मधुरा महाडिक, ग्रामसेवक गणेश पाटील यांच्यासह हरेश पाटील, सचिन बेलकडे, विजय सांळुखे, ललित ढाकवल, माजी पोलिस पाटील भास्कर पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नवनिर्वाचित सरपंच सुधिर पाटील यांनी सांगितले की गावाच्या विकासासाठी तरुणांना सोबत घेऊन पुढची वाटचाल करणार आहे तर विकासाच्या दृष्टिकोनातून गावातील पाणी, रस्ते, गटारे यासह अन्य विकासात्मक कामे करणार असल्याचे सांगून गावाची शांतता टिकविण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नवनिर्वाचित सरपंच यांचा रायगड जिल्हा परिषदेच्या सभापती ॲड.निलिमा पाटील, सदस्य डी.बी.पाटील, राजन गावंड आदिंनी त्यांचे अभिनंदन केले.








Be First to Comment