उरण तालुका वकील संघटनेच्या अध्यक्षपदी दत्तात्रेय नवाळे
सिटी बेल • उरण • घन:श्याम कडू •
उरण तालुका वकील संघटनेची काल निवडणूक संपन्न झाली. या निवडणुकीत अध्यक्षपदी दत्तात्रेय नवाळे हे बहुमताने निवडून आले. वकील दत्तात्रेय नवाले यांची अध्यक्षपदी निवड होताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नवनिर्वाचित अध्यक्ष दत्तात्रेय विठ्ठल नवाळे यांनी २०२२-२३ सालाकरिता कार्यकारणीची निवड पुढील प्रमाणे केली आहे. उपाध्यक्षपदी भारती पांडुरंग भोईर, किशोर धनाजी ठाकूर, सचिवपदी प्रसाद नामदेव पाटील, खजिनदारपदी अर्चना सुनील माळी, ऑडीटर संतोष नारायण पाटील, सभासद अझीमन रईस अहमद अन्सारी, वृषाली नवनीत पाटील, विपुल रमाकांत ठाकूर, धिरज लहू डाकी अशी आहे.

उरण तालुका वकील संघटनेच्या २०२२-२३ या सालाकरिता नवनिर्वाचित कार्यकारणीची निवड करण्यात आलेल्या सर्वांवर अभिनंदनाचा वर्षाव होऊन पुढील कार्यास अनेकांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.








Be First to Comment