Press "Enter" to skip to content

नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या हस्ते

कर्जत नगरपरिषदेच्यावतीने अनेक कामांचे लोकार्पण

सिटी बेल • कर्जत • संजय गायकवाड •

कर्जत नगर परिषद स्वच्छ व सुंदर कर्जतच्या दिशेने वाटचाल करत आहे कर्जत नगर परिषद क्षेत्राच्या सौंदर्यात भर पडण्यासाठी कर्जत नगर परिषदेने कोपरा गार्डन संकल्पना राबवली आहे, या कोपरा गार्डनच्या माध्यमातून नगरपरिषदेने अनेक ठिकाणी स्टॅच्यू उभारले आहेत त्याचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला.

थेट नगराध्यक्ष च्या निवडणुकीत विजयी ठरलेल्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार सांभाळला या घटनेला काल दि.18 फेब्रुवारी 2022 रोजी तीन वर्षाचा कालावधी पूर्ण झाला तसेच त्यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून कर्जत नगरपरिषदेने स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतून बांधकाम केलेल्या कोपरा गार्डन कर्जत सुशोभीकरण तसेच रस्ते गटार बांधकामाचे लोकार्पण सोहळा नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, नगरसेविका भारती पालकर, सुवर्णा निलधे, विशाखा जिनगरे, प्राची डेरवणकर,संचिता पाटील, पुष्पा दगडे, मधुरा चंदन, स्वामिनी मांजरे, वैशाली मोरे तर नगरसेवक शरद लाड, विवेक दांडेकर, नितिन सावंत, बळवंत घुमरे, सोमनाथ ठोंबरे, राहुल डाळींबकर, उमेश गायकवाड उपस्थित होते.

विविध कामाचे लोकार्पण करताना नगराध्यक्ष सुवर्णा जोशी याप्रसंगी नगरसेवक, नगरसेविका

कर्जत नगर परिषद क्षेत्रातील भिसेगाव येथील गजानन महाराज मंदिर, भिसेगाव खिंड,मुद्रे आय लव यू कर्जत, एक्साईज बँक, कोतवाल नगर, कोर्टासमोर, महावीर पेठ, पिंटो गॅस एजन्सी जवळ, कचेरी रोड, योगा, शेतकरी, दहीवली लहान पुलाजवळ, दहीवली घाटा जवळ, सुनील चिक्की जवळ मंकी पॉईंट अशा ठिकाणी बनवण्यात आलेल्या सुमारे 1 कोटी 2 लाख 7 हजार 756 रुपये खर्च करून कोपरा गार्डने कर्जत सुशोभीकरण करण्यात आले आहेत. तसेच कर्जत पाटील आळी तेथील किशोर जाधव यांचे घर ते हसमुख शहा यांचे घरा पर्यत नगरपरिषद निधीतून 11 लाख 14 हजार 214 रुपये खर्च करून गटाराचे चे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे व बामचा मळा आकुर्ले गावातील विशेष वैशिष्ट्यपूर्ण निधी मधून 19 लाख 90 हजार 372 रुपये खर्च करून अंतर्गत गटारे व रस्ता काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. अश्या सुमारे 1 कोटी 33 लाख 12 हजार 342 रुपयांच्या कामचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी शिवसेनेचे भाई गायकर, मोहन ओसवाल,केतन जोशी, संदीप भोईर,गणेश मुंढे, भाजपचे दिपक बेहेरे, प्रशांत उगले, मंदार मेहेंदळे, मारुती जगताप आदी कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.